Posts

Showing posts from 2013

जावे स्मार्टफोनच्या देशा….

Image
"मोबाईल ही आता गरज राहिलेली नसून आता एक सवय झाली आहे !!!" मुंबई - पुणे - मुंबई चित्रपटातील हे वाक्य म्हणजे आजच्या Smartphone Addiction ची मूर्तिमंत पावती !! मोबाईल वापरणारा माणूस आणि स्मार्टफोन हे समीकरण आता चितळे आणि बाकरवडीइतकं Obvious झालंय. त्यामुळे आत्ताच्या जमान्यात ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही तो एकतर अंग्रेज के जमानेका तरी समजला जातो किंवा आर्थिक स्थितीने Unsmart बनवलेला तरी !! मी यातल्या दोन्ही प्रकारात मोडत नव्हतो कारण स्मार्टफोन ही माझी तत्कालीन गरज नव्हती. घरी अनलिमिटेड इंटरनेट,आयडीयाच्या कृपेने कॉलिंग रेट कमी आणि Daily १०० SMS या सगळ्या श्रीमंतीमध्ये मी अगदी सुखाने जगत होतो. पण नशिबात योग लिहिलेला असताना तुम्ही काही हालचाल केली नाहीत तर देवच तुमच्याकडून ती करवून घेतो आणि तुम्हाला तो योग अनुभवायला किंवा ते दु:ख भोगायला लावतोच. माझ्या बाबतीत दुसरी गोष्ट आधी झाली आणि पहिली त्याच्या नंतर !!!
सॅमसंग कंपनीने Android चे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे फोन बाजारात अगदी नगण्य किंमतीला आणले आणि तिथेच पारंपारिक नोकियाचा जवळपास कडेलोट झाला. "स्टेटस सिम्बॉल" किंवा अगदीच स्पष्…

दीपस्तंभ..!!!

Image
आयुष्यात काही क्षण असे असतात की ते अवचितपणे समोर येतात. अलगदपणे हाती गवसतात. त्यांना अनुभवण्याची संधी ते आपल्याला देतात आणि कायमचे आपल्या मनाच्या कोप-यात एक अढळ ध्रुवपद निर्माण करतात. आमच्या कोकणदिवा ट्रेकची गोष्टही अगदी अशीच आहे !! ५ जूनला पानशेतजवळच्या घोळ गावात आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजत आले होते. घोळच्या सुरेश पोळेकरांनी ट्रेकर आहेत म्हटल्यावर जास्त विचारपूस करण्याचा घोळ न घालता आपणहून ओसरी मोकळी करून दिली. पोळेकरांच्या स्वच्छ सारवलेल्या अंगणात झोपण्याचा आमचा निर्णय अचानक भरून आलेल्या आभाळाने आपणहूनच फेटाळला आणि परिणामी आमची रवानगी घरात झाली. रात्रभर पावसाची रिमझिम सुरूच होती. पहाटे पाच वाजता अचानक घोळच्या "खाऊन माजलेल्या" एका कोंबड्याने नेमकं आमच्याच कानापाशी आपला सगळा जीव एकवटत कर्णकर्कश्श तुतारी वाजवली आणि सहा वाजता निवांत उठायचा आमचा प्लॅन त्या बांगेबरोबरच घाटावरच्या पावसाळी हवेत विरून गेला !! घोळ गावही एव्हाना जागं झालं होतं. आज ६ जून. शिवराज्याभिषेक दिन !! आम्ही हा दिवस आज कोकणदिव्यावरून अनुभवणार होतो. सुरेश पोळेकरांना उद्या कोकणदिव्याची वाट दाखवाय…

अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती - भाग दोन (अंतिम)

Image
अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती : दिवस पहिला
इथून पुढे…

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टींग होती. सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपलेल्या मंदिरात आंबे बहुलामधला कोणी भाबडा भक्त पंढरीच्या विठ्ठलाच्याही कानठळ्या बसतील इतक्या मोठया आवाजात कुठलसं भजन गात होता. त्याच्या भजनाच्या पहिल्या तीन - चार सेकंदातच आम्ही खाड्कन उठून बसलो आणि त्यानंतर पुन्हा झोपायची हिम्मतच होईना. का कुणास ठाउक पण त्या तीन - चार सेकंदात आंबे बहुलामधल्या विठ्ठलासकट जगातल्या सगळ्या विठ्ठल मूर्तींनी आपापले कमरेवरचे हात काढून कानावर ठेवलेत असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर अवतरलं !!! आम्ही त्या भक्तापासून ऊर्ध्व दिशेला अवघ्या काही फुटांवरच होतो. पण जिथे ते सावळं परब्रम्ह नाही बचावलं तिथे आम्हा पामरांची काय कथा !! त्याचं भजन सुमारे वीसेक मिनिटांनंतर संपलं आणि त्यानंतरच आमची खाली जायची हिम्मत झाली. एव्हाना उजाडू लागलं होतं.  प्रमोदला आम्ही झोपेतून जागे झालोय याचं बहुदा स्वप्न पडलं असावं कारण आम्हाला द…