Posts

Showing posts from January, 2013

सफर सातमाळा रांगेची - दिवस दुसरा..

Image
नाशिक जिल्ह्यातल्या किल्ल्यांना सह्याद्रीने एक अचाट वैशिष्ट्य प्रदान केलं आहे.यातला कोणताही किल्ला चढून वर आलो की " हा किल्लाच राक्षसी होता का आपणच दिवसेंदिवस खच्ची होत चाललोय " हा प्रश्न ट्रेकरच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही !!! रवळ्या-जवळयाला जाताना आरामात गेलो असलो तरी येतानाची सरळ पठारावरची का होईना पण तंगडतोड सगळ्यांनाच नकोशी झाली होती.त्यात पुन्हा मार्कंडयाने उरलासुरला जीवही संपवला होता.पण मार्कंडयाच्या रंगनाथ बाबा आश्रमाने असा काही श्रमपरिहार केला की सकाळी उठल्यावर आजच पहिला दिवस आहे असं प्रत्येकाला वाटून गेलं!!! हा आश्रम म्हणजे शब्दश: आपण बी.आर.चोप्रांच्या महाभारत सिरिअल मध्ये बघितला आहे ना सेम अगदी तस्साच आहे.सगळीकडे एक सुखद शांतता,पक्ष्यांचा कान तृप्त करून टाकणारा आवाज,आश्रमाच्या आतून येणारे मंत्रांचे पवित्र स्वर आणि संपूर्ण आसमंतावर पसरलेली एक सुंदर अनुभूती..वर्णन करायला शब्दच कमी पडावेत !!! तसं मार्कंडयाच्या पठारावर अजून तीन - चार आश्रम आहेत.पण या आश्रमाची सर कशालाच नाही.सकाळी ५.३० ला दिपक ने अलार्म कॉल दिला तेव्हा "सकाळ का होते&quo…

सफर सातमाळा रांगेची - दिवस पहिला

Image
नाशिक जिल्हा!!!! काय या नावात जादू आहे कळत नाही राव  !!! केवळ या नाशिक जिल्ह्याला सह्याद्रीने बहाल केलेल्या मूर्तिमंत रौद्रपणावर फिदा होउन हा संपूर्ण नाशिक जिल्हा शब्दश: चाटून - पुसून काढलेले अनेक ट्रेकर्स सापडतील!!! अगदी कळसूबाई AMK पासून ते पार साल्हेर - मुल्हेर पर्यन्त एकही किल्ला असा नाही ज्याने ट्रेकर्सच्या मनात घर केल नसेल.मुंबईच्या 'शिखरवेध' संस्थेच्या जगदीश पाटील या आमच्या मित्राने 'Mumbai Hikers' वर "१९-२० जानेवारी २०१३ रवळ्या - जवळया - मार्कंडया - सप्तश्रुंग - रामसेज" हा 'पिल्यान' पोष्ट केल्या केल्या बहुदा दुस-याच मिनिटाला त्याचा भ्रमणध्वनी खणाणला. "मी पुण्याहून ओंकार ओक बोलतोय.पैसे कुठे अन कसे भरायचे ते सांग ". फोन बंद!!! जगदीशनेही अगदी ट्रेकरच्या तत्परतेने मला संपूर्ण कार्यक्रम मेल केला.भारीच होता तो!!!! पुण्यातल्या आमच्या भटक्या जमातीतल्या लोकांना "येणार का" अशी विचारणा करताच ठरलेलं उत्तर आलं "२ दिवस ? नाही जमणार". "सिक्स्थ सेन्स" वगैरे तसली काहीतरी भानगड असते  ना ती  बहुदा माझ्यातही  असावी .य…