Posts

Showing posts from February, 2013

"ती" अविस्मरणीय कोजागिरी...!!!

Image
"नमस्कार.आजच्या ठळक बातम्या.रत्नागिरी जिल्ह्यात इतके दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज अचानक रौद्ररूप धारण केले असून ढगफुटी झाल्यासारखा प्रचंड पाऊस रत्नागिरी शहर,खेड तालुका व आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून पडत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा हा जोर कायम राहिल्यास पुढच्या दोन दिवसात हा भाग पूरग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा लागेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे .रत्नागिरीकडे व खेड तालुक्याकडे येणारे वाहतुकीचे सर्व रस्ते बंद झाले असून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.पावसाने अचानक धारण केलेल्या या भीषण रुपामुळे स्थानिक जनतेकडून चिंता व्यक्त केली जात आहे .."

पुढच्या काही मिनिटांत फोन खणाणतो...... 
"हॅलो मी अजय बोलतोय.अरे आत्ताच न्यूज बघितल्या.सो आमच्या तिघांचही ट्रेकला येणं कॅन्सल होतंय."
"अरे पण............."  फोन कट...!!!!
होय.......ही गोष्ट आहे आमच्या अशाच एका अविस्मरणीय अनुभवाची...सह्याद्रीने पेश केलेल्या त्याच्या अद्वितीय रुपाची...आणि कायम लक्षात राहतील अशा काही सुंदर क्षणांची...!!!!
तर त्याचं असं झालं ....
दरवर्षीच्या शिरस्त्याप्रमाणे सप्टेंबर …

"भूकंप" गडावरचा "खादाडेश्वर" .....

Image
आपण सह्याद्रीत का फिरतो याला अनेक कारणं आहेत.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून चार घटका निसर्गात जावं..तिथल्या रानपाखरांशी गप्पा माराव्यात...दोन क्षण स्वत:शीच अंतर्मुख होण्यासाठी....वगैरे अनेक कारणं देत येतील.पण ट्रेकला गेल्यावर "क्षुधागडाची" अर्थात आपल्या मनसोक्त हादडण्याची मोहिम यशस्वी झाली नाही तर ट्रेकमध्ये काहीतरी राहून गेलंय असं राहून राहून वाटायला लागतं !!!!! म्हणूनच दिवसभर पाय तुटेस्तोवर भटकल्यावर पोटात जो काही "भूकंप" होतो (= मरणाची भूक लागते !!! ) ती भागवायला एखादा सिद्धहस्त आचारी मदतीला धावून आला तर त्या ट्रेकच्या आठवणींना एक वेगळाच नूर चढतो !!!! काल तैलबैल्याहून येताना (कितव्यांदा गेलो असेन आठवत नाही !!!) मुळशीच्या "दिशा" धाब्याने जो काही श्रमपरिहार केला आहे तो एन्जॉय करतानाच आजवरच्या ट्रेक्स मधल्या अश्या अनेक ठिकाणांची यादीच सर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आपल्यासारख्या पट्टीच्या "बकासुरां" बरोबर  ती शेअर करायचं ठरलं !!!        आता ट्रेकमध्ये व्हेज खावं की  नॉन - व्हेज हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न !!! मी मात्र या दोन्ही …