Posts

Showing posts from March, 2013

गिरीदुर्गांचा षटकार - दिवस दुसरा - उत्तरार्ध

Image
गिरीदुर्गांचा षटकार - दिवस पहिला - एक नाट्यमय सुरुवात  इथून पुढे….

सकाळचे साडेसहा वाजले असावेत (आम्ही अर्थातच झोपेत होतो !!!!). आमच्या बंगल्याची बेल सारखी कोणीतरी वाजवतंय असा भास मला त्या अर्धवट झोपेतही होत होता. कडाक्याची थंडी पडली होती.  शेवटी "मरू दे…किती वेळ वाजवणारे…कंटाळून जाईल निघून !!" या दुष्ट विचाराला आवर घालून अखेर मी दरवाजा उघडला.माझ्या अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना आधी समोर फक्त वाफच दिसली आणि मागोमाग "साहेब चहा आणि बिस्कीटं आणलीयेत " या शब्दांनी मला निद्रागडाच्या कोकणकड्यावरून जोरात ढकललं आणि मी पूर्णपणेभानावर आलो !!! दिनेशने आम्ही फोन करायच्या आधीच चहा पाठवून दिला होता. विनयला मी महत्प्रयासाने उठवलं (हे आजच्या दिवसातलं सर्वात अवघड काम होतं !!!). आज गोविंदगड बघून कुंभार्ली घाटामार्गे गुणवंतगड आणि दातेगड पाहून पुणं गाठायचं  होतं. कोणत्याही ओव्हरनाईट ट्रेकच्या शेवटच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मनात पहिला विचार जर कोणता येत असेल तर "आज घरी जायचंय" हा !!!! हाडाच्या भटक्यांसाठी ह्याच्यासारखं वेदनादायक वाक्य दुसरं कोणतंही नसावं !!! आपल्यासाठी एका अ…

गिरीदुर्गांचा षटकार - दिवस पहिला

Image
अनुभव ही पण एक अजब चीज आहे. त्याचं चांगला किंवा वाईट ह्या विभागांमध्ये वर्गीकरण करायला कोणतंही फिक्स असं परिमाण नाही. ज्यानं ज्याच्या त्याच्या मतांनुसार ह्याची तीव्रता ठरवावी इतकं साधं सरळ स्वातंत्र्याचं तंत्र शिकवणारा हा प्रकार !!! पण जाता जाता आयुष्यभराची शिकवण मात्र देणारा !! आमच्या कोकण बाईक एक्सस्पिडीशनची स्टोरी पण अशीच असंख्य भन्नाट अनुभवांनी सजलेली…काही अनपेक्षित पण अविस्मरणीय घटनांनी नटलेली आणि अशाच काही सुखद आठवणींनी बहरलेली….!!! अलंग - मदन - कुलंग नामक सह्याद्रीतील एका दमदार ट्रेकनंतर श्रमपरीहारासाठी एखादा सोपा पण ज्यात डोळ्यांना  मेजवानी आहे असा ट्रेक हवा होता. त्यामुळे दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातले सहा सर्वांगसुंदर किल्ले आणि साथीला पहिलीपासूनचा भक्कम दोस्त विनय बिरारी असल्यावर अजून काय हवं !!! मोहिमेचा "अजेंडा" होता….मंडणगड - पालगड - रसाळगड - गोविंदगड उर्फ गोवळकोट - दातेगड आणि गुणवंतगड. 

सदर ट्रेकची रूपरेषा खालीलप्रमाणे होती. 

दिवस पहिला :

१.  पुणे - ताम्हिणी घाट - माणगाव - गोरेगाव - आंबेत फाटा - मंडणगड 

२. मंडणगड - खेड रस्ता - धामणी - पालगड 

३. पालगड - खेड - तळे …