Posts

Showing posts from June, 2013

गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग दोन (उत्तरार्ध)

Image
गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक   
इथून पुढे…. 


"पका…ए पका…उठ. सहा वाजत आलेत. साडेसहाला निघायचंय आपल्याला. वर जाऊन झोप परत. आज अजून एक किल्ला बाकी आहे. उठ लवकर (हे शेवटचं जरा ओरडून !!) "  " चिन्या ****च्या. गप झोपू दे मला. आयला एकतर कालपासून झोप नाही. त्यात रात्री फर्स्टक्लास जेवण झालंय आणि आत्ता थंडी पण आहे. मी सात वाजता उठणारे. तुला एकट्याला जायचं तर जा !! " " पका…पाच मिनिटाच्या आत जर उठला नाहीस तर जो भाग वर करून झोपला आहेस तो असा सूजवेन की गाडीच्या सीटवर बसायची पण बोंब होईल !!!"  चिन्मयचं हे निर्वाणीचं वाक्य ऐकून पकाच काय पण गाडीची अर्धी काच खाली करून झोपलेले काकाही ताडकन उठले !!! बघतो तर चिन्मय कालच्या त्या रखवालदारांची फुटभर काठी हातात घेऊन उभा होता. त्याच्या मते माणसाने सहा तासांपेक्षा जास्त झोपल्यास त्याला बुद्धीमांद्य येतं आणि ते वयोमानाप्रमाणे वाढत जातं. हे तत्वज्ञान चिन्मयला त्याच्या रशियन मास्तराने स्वानुभवावरून शिकवलं असावं !!! कारण हे तत्व भारतात लागू  झाल्यास शिक्षणव्यवस्था किंवा नोक-या यांच्यामध्ये केवळ नॉर्मल लोकांसाठी आरक्षण ठेवायची वे…

गिरीदुर्गांच्या साम्राज्यात - भाग एक

Image
कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्याची नशा चढावी लागते असं म्हणतात. एकदा का त्या गोष्टीनं तुम्हाला झपाटून टाकलं की ती तडीस नेण्याची मजाच वेगळी असते.महाराष्ट्रातल्या तमाम गिर्यारोहकांवर असंच एक गारुड स्वार झालंय. त्याचं नाव आहे "सह्याद्री" !!! आज सह्याद्री प्रत्येक गिर्यारोहकाचा केवळ छंदच नाही तर आयुष्य बनला आहे. त्याच्या द-याखो-यातून रानोमाळ भटकण्याचं लागलेलं व्यसन हे जगातलं सगळ्यात "पॉझीटिव्ह" व्यसन असावं आणि ते सुटावं अशी अपेक्षाही नाही !!! नाशिक जिल्हा !!! महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त डोंगरी किल्ले उराशी बाळगणारा प्रदेश म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या जिल्ह्याची बातच काही और आहे !! हातगड - अचला पासून ते साल्हेर - मुल्हेर पर्यंत आणि आड - पट्ट्यापासून ते गाळणा - कंकराळ्या पर्यंत एकापेक्षा एक सरस आणि सुरम्य गिरिदुर्ग या नाशिक जिल्ह्याने धारण केले आहेत. या जिल्ह्यातल्या डोंगररांगा सुद्धा तितक्याच वेधक. सेलबारी - डोलबारी असो किंवा त्र्यंबक - वाघेरा ची रांग…स्वत:च आपलं एक खास वैशिष्ट्य आहे. पण या सगळ्याची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे सातमाळा रांग !!! चौदा अभेद्…