Posts

Showing posts from August, 2013

विश्रामगड - मानगड…सह्याद्रीचा सर्वांगसुंदर अविष्कार !!!

Image
सात वाजत आले होते. मुळशीच्या हिरवाईने बहरलेल्या आसमंतामुळे म्हणा किंवा हवेच्या सुखद गारव्यामुळे,"सह्याद्री एक्स्प्रेस" आज पंख फुटल्यासारखी धावत होती. आजच्या या पावसाळी सफरीचे भिडू आम्ही दोघंच,मी आणि देवेश. पण आज आम्ही सह्याद्रीतल्या दोन नितांत सुंदर आणि पावसाळ्यातला स्वर्ग मानल्या गेलेल्या विश्रामगड आणि मानगड या रायगड जिल्ह्यातल्या भिडूंना भेटायला निघालो होतो. देवेशला पहाटे साडेचार वाजता अलार्म कॉलचा फोन करतानाच आमच्या संतोषगड - वारुगड ट्रेकचा अनुभव लक्षात ठेवून "अंघोळीत वेळ घालवून उशीर केलास तर ****** " असली धमकीच दिल्याने त्या बिचा-यानेही पावसातच भिजू हे कारण पुढे करत त्या पवित्र गोष्टीवर "पाणी सोडलं होतं !!!" त्यामुळे आम्ही वेळेवर निघण्याला कारणीभूत असलेली ही एक अतिशय महत्वाची गोष्ट होती (मी मात्र मुलगी बघायला निघाल्यासारखा चाललो होतो !!). ताम्हीणीत पूर्वेकडे उसळलेला ढगांचा समुद्र,त्यातून डोकं वर काढणारे घनगड आणि तैलबैला आणि डावीकडे जमलेल्या धबधब्यांच्या रांगा हे दृष्य म्हणजे आम्ही योग्य महुर्त साधल्याची निसर्गाने दिलेली पावतीच होती.मग विळे फाट्याला…