Posts

Showing posts from October, 2013

अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती - भाग दोन (अंतिम)

Image
अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती : दिवस पहिला
इथून पुढे…

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टींग होती. सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपलेल्या मंदिरात आंबे बहुलामधला कोणी भाबडा भक्त पंढरीच्या विठ्ठलाच्याही कानठळ्या बसतील इतक्या मोठया आवाजात कुठलसं भजन गात होता. त्याच्या भजनाच्या पहिल्या तीन - चार सेकंदातच आम्ही खाड्कन उठून बसलो आणि त्यानंतर पुन्हा झोपायची हिम्मतच होईना. का कुणास ठाउक पण त्या तीन - चार सेकंदात आंबे बहुलामधल्या विठ्ठलासकट जगातल्या सगळ्या विठ्ठल मूर्तींनी आपापले कमरेवरचे हात काढून कानावर ठेवलेत असं दृश्य माझ्या डोळ्यासमोर अवतरलं !!! आम्ही त्या भक्तापासून ऊर्ध्व दिशेला अवघ्या काही फुटांवरच होतो. पण जिथे ते सावळं परब्रम्ह नाही बचावलं तिथे आम्हा पामरांची काय कथा !! त्याचं भजन सुमारे वीसेक मिनिटांनंतर संपलं आणि त्यानंतरच आमची खाली जायची हिम्मत झाली. एव्हाना उजाडू लागलं होतं.  प्रमोदला आम्ही झोपेतून जागे झालोय याचं बहुदा स्वप्न पडलं असावं कारण आम्हाला द…

अनवट चौकडीची स्वच्छंद भ्रमंती : दिवस पहिला

Image
"विन्या उठलास का. चार वाजलेत. साडेपाचला येतोय तुझ्या घराखाली. आवर पटकन." शनिवार सकाळचा अत्यंत परिचित असणारा हा संवाद. विनयला अलार्म कॉल करून झाल्यावर मीही तयारीला लागलो. संदर्भ पुस्तकं, नकाशे,खादाडीचं सामान आणि इतर आवश्यक वस्तू सॅकमध्ये आपापल्या जागी जाउन स्थानापन्न झाल्या. बुटाच्या नाड्या आवळल्या गेल्या…बाईक सुरु केल्याचा आवाज पहाटेच्या शांत वातावरणाला क्षणार्धात चिरत गेला...आणि नाशिकच्या दिशेने एका अनवट सफरीची  सुरुवात झाली !! नगर जिल्ह्यातल्या भैरोबा दुर्ग - पेमगिरी आणि नाशिक जिल्ह्यातल्या बहुला - त्रिंगलवाडी या परिचित - अपरिचित गिरीदुर्गांच्या भेटीची ओढ लागून जवळपास महिना उलटला होता.पण चांगल्या कामांना योग्य वेळी योग्य मुहूर्त सापडतोच असं नाही. सबमिशन्स,क्लासेस,परीक्षा आणि अधून मधून घरच्यांनी आमच्या नावाने उधळलेली मुक्ताफळं ह्या सगळ्या गोष्टी एकदाच्या विनासायास पार पडल्या आणि नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवार - रविवारी दोन दिवसात चार किल्ल्यांच्या ट्रेकवर अखेर शिक्कामोर्तब झालं. शनिवारी पहाटे घरातून बाहेर पडताना मातोश्रींनी टोला हाणलाच...
"दर रविवारी उनाडक्या करता. …