Posts

Showing posts from January, 2014

जुन्नरची मुशाफिरी - भाग एक

Image
नोव्हेंबर महिन्याचे अखेरचे दिवस !! गिर्यारोहणाचा सर्वांगसुंदर काळ. पण गेल्या सप्टेंबर - ऑक्टोबरपासून परीक्षा,सबमिशन्स,व्हायवा इत्यादी शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यात कमालीची उदासीनता आणणा-या षडरिपूंनी  अगदी नको त्याच वेळेसच वक्री होऊन त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केलेली !!  सुरळीत चाललेल्या ट्रेकिंगचं अखंडत्व भंग करण्यात ज्यांनी मेनकेचा रोल अगदी समर्थपणे निभावलाय अशा या गोष्टींमुळे दगडावर शेवाळं साचावं तसं पचवलेलं अन्न पोटावर साचायला लागलं होतं. त्यामुळे आता ख-या अर्थाने "चरबी उतरवण्याची" वेळ येउन ठेपली होती. जुन्नर विभागातल्या हडसर,चावंड आणि सिंदोळा या सह्याद्रीच्या सगळ्याच विविधतांनी संपन्न असलेल्या गिरीदुर्गांवर ब-याच विचारांती मोहीम ठरवण्यात आली. पण जमलेले लोक ऐन वेळी कॅन्सल नाही झाले तर त्याला ट्रेक कसं म्हणता येईल !!! त्यामुळे शुक्रवार उजाडेपर्यंत या ट्रेकमध्ये मला ओळखणारा असा फक्त मीच उरलो !!! पण एखादा ट्रेक व्हावा हे बहुदा विधिलिखितच असल्याने फेसबुकवर नुकतीच ओळख झालेल्या आणि पिंपरी - चिंचवडचे सन्माननीय रहिवासी असणा-या प्रीतम आणि राजेशचा सहजच फोन आ…