Posts

Showing posts from March, 2014

जुन्नरची मुशाफिरी : भाग दोन : अंतिम

Image
जुन्नरची मुशाफिरी - भाग एक

इथून पुढे….

"दादा ओ दादा…उठलात का ?? बाबांनी बोलीवलय नाष्टा करायला अन मला सांगितलंय तुमाला गडावर घेऊन जा म्हनून. घरी या लवकर. वाट बघतोय…!! " सकाळी सहाच्या सुमारास चावंड परिसरात भूकंप व्हावा अशा रीतीने आश्रमशाळेच्या खोलीचं दार वाजत होतं. त्या भयानक आवाजामुळे खडबडून जागे होत आम्ही जे अंथरुणावर उठून बसलो त्यानंतर झोपायची इच्छाच झोपली !!! कवटे काकांचा मुलगा बाहेरून अशा पद्धतीने दार वाजवत होता की जणू काही आम्ही झोपायच्या ऐवजी कित्येक महिन्यांपासून कोमात आहोत आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाहीये !!! वैतागून दार उघडलं तेव्हा आमचे चेहेरे बघून त्याने अन त्याच्या दोन मित्रांनी तिथून सरळ पळ काढला. सकाळचे कार्यक्रम उरकले तेव्हा नुकतंच कुठे पूर्व दिशेचं दार उघडत होतं. कवटे काकांनी मात्र आदरातिथ्यात कसलीही कसूर सोडली नव्हती. सकाळी सात वाजता गरमागरम कांदेपोहे आणि वाफाळता चहा घेतल्यावर आमचा चावंड चढाईचा उत्साह कित्येक पटीने वाढला. कवटे काकांचे चिरंजीव आणि त्याचे तीन मित्र खाटकाने बोकडाची वाट बघावी तसे चेहेरे करून आमच्याकडे पहात होते. त्यांच्यावर आम्हाला…