Posts

Showing posts from July, 2014

"सुर"म्य भ्रमंती

Image
"हॅलो…मला उद्या जमत नाहीये. माझं कॅन्सल झालंय !!"…… कमालीच्या निर्लज्ज आवाजात आणि कोणत्याही प्रकारचा "गिल्ट" मनात न बाळगता आशिष दामलेने शनिवारी रात्री आठ वाजता हा फोन केला आणि माझी झोपच उडाली !!! उद्या सुरगडचा ट्रेक. जेवणाच्या डब्यासकट सगळी तयारी झालेली. त्यात ह्या ट्रेकचे भिडू दोघंच… मी आणि दामले. आता हा "आगाशे" (ह्याचा लॉन्ग फॉर्म भेटल्यावर सांगेन !!) झालाय म्हणल्यावर ट्रेक खड्ड्यात गेला हे उघडंच होतं. पावसाने जोर धरलेला आणि सह्याद्री हिरवाईने सजलेला !! सुरगडाची ओढ काही स्वस्थ बसू देईना. त्यात सुरुवातीपासूनच सोलो ट्रेकिंगच्या प्रचंड विरोधात असल्याने एकट्यानं जाण्याचा सवालच नव्हता. त्यामुळे हाही ट्रेकपावसात विरघळून जाण्याची शक्यता कोणीही बदलू शकत नव्हतं !! पण रात्री साडेदहा वाजता अचानक जादूची कांडी फिरावी तसा एक अविश्वसनीय चमत्कार झाला. पलीकडून सौरभ बोलत होता……  "अरे मी आणि बाबा उद्या सुरगडला जाणार आहोत…प्लीज माहिती देशील का ???"
चलबिचल होत असलेलं मन क्षणार्धात शांत झालं आणि डोळ्यासमोर हिरव्यागार  सुरगडाची दृश्य तरळायला लागली. किल्ल्याची नुसती…