Posts

Showing posts from August, 2014

"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान

Image
महाराष्ट्रातअजस्त्ररित्या पसरलेल्या सह्याद्रीच्या अभेद्य डोंगररांगांना कोंदण लाभलंयते अप्रतिम अशा गिरीदुर्गांचं !! सह्याद्रीतला कोणताही किल्ला हा दुस-याकिल्ल्यासारखा नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या सगळ्याच किल्ल्यांनी आपलंस्वत:चं एक खास असं वैशिष्टय जपलं आहे. कोणाचा कोकणकडा रौद्रभीषण तरकोणाचा बालेकिल्ला प्रेक्षणीय …कोणाचा विंचूकाटा सुप्रसिद्ध तर कोणाचंपरशुराम शिखर अस्मानाला भिडलेलं !!! महाराष्ट्रातल्या काही किल्ल्यांचीदुरवस्था मात्र मन विषण्ण करणारी !! पण वाळवंटात अचानक पाण्याचा साठासापडावा किंवा भाजून काढणा-या वैशाखवणव्यात थंड वा-याचा झोत सुखावून जावातसं काहीसं आमच्या बाबतीत झालं. पडझड झालेल्या किल्ल्यांची दुरवस्था बघूनहेलावून गेलेल्या मनांना दिलासा दिला तो औरंगाबाद जिल्ह्याने आणिसह्याद्रीच्या लाखमोलाच्या पाच गिरीदुर्गांचा खजिनाच आम्हाला अलगद सापडला !!!  २०१४सालाने आत्तापर्यंत आपल्याला काय दिलं तर काही जोडून येणा-या सुट्टया आणित्यांचीच परिणती म्हणून शिजणारे दुर्गभ्रमंतीचेप्लॅन्स !! ऑगस्ट महिनाम्हणजे आपल्यासाठी जणू काही वरदानच ठरला आणि दिनांक १४ ते १८ ऑगस्ट जोडूनसुट्टया आल्या. घरी बस…