Posts

Showing posts from September, 2014

"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा

Image
"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान
 इथून पुढे चालू…. 

नियोजित पिल्यान परमाने आज आम्हाला ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे चाळीसगाव गाठायचं होतं. हा मार्ग नाशिक - मालेगाव मार्गे चाळीसगाव असा आहे. मुंबई - आग्रा हायवेवर लोण्याच्या गोळ्यावरून गाडी चालत असल्याचा भास होत होता. चांदवड गावाच्या बाहेर हायवेलाच हॉटेल भैरवनाथ मध्ये खुमासदार मिसळ,रस्सावडा,कांदाभजी आणि गरमागरम चहा हाणला तेव्हा कुठे आत्मा थंड झाला !!! इंद्राई किल्ल्याजवळच्या वडबारे गावाच्या फाट्यानंतर मुंबई - आग्रा हायवे उताराला लागला आणि त्यानंतर गाडीने उजवीकडे चाळीसगावच्या दिशेने मोर्चा वळवला आणि इथेच लोण्याचा गोळा हा भाजलेल्या पापडात बदलला !!! आपण इतका वेळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होतो ही सुखावणारी जाणीव आता कंबरदुखीमध्ये परिवर्तित होत होती. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग (???) हा प्रवास विलक्षण तापदायक होता. चाळीसगाव वरून आम्ही अंतुर किल्ल्याच्या जवळ असलेल्या त्यातल्या त्यात मोठया म्हणजे नागद गावाकडे निघालो. आज १५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिनाची तयारी अतिशय उत्साहात सगळीकडे सुरु होती. छोटया…