Posts

Showing posts from October, 2014

श्रीमंत किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग तीन (अंतिम) : सुतोंडा,वेताळवाडी आणि वैशागड

Image
"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग १ : : नियोजन आणि प्रस्थान

"श्रीमंत" किल्ल्यांच्या प्रदेशात - भाग २ : : अंतुर आणि लोंझा

इथून पुढे….

दिनांक १६ ऑगस्ट. बनोटी गावातल्या अमृतेश्वाराच्या राऊळावर पूर्वा उजळली. अमृतेश्वर मंदिराचा परिसर अतिशय सुंदर !!! आभाळाला भिडलेला मंदिराचा कळस,विलक्षण स्वछ असलेलं आवार,शेजारी खळखळत वाहणारी नदी आणि त्या सुंदर सकाळी कानावर पडणारी रानपाखरांची भूपाळी !!! दिवसाची झालेली सुरम्य सुरुवात !! आज आम्हाला सुतोंडा बघून सोयगाव मार्गे वेताळवाडी आणि वैशागड हे किल्ले बघून परतीचा प्रवास सुरु करायचा होता. श्रावणातल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे रात्रीचे वारकरी सकाळी बदलले आणि पुन्हा एकदा त्या वाद्याचा झंकार अखंडितपणे सुरु झाला. सकाळी मंदिरात आलेल्या लोकांपैकी एकाला आम्ही विचारलं, "वाडीचा किल्ला (सुतोंडा) कोणता हो ??" "त्यो काय समोरचा." बनोटी गावाच्या पश्चिमेला असलेल्या एका उंच डोंगराकडे बोट दाखवत तो म्हणाला. त्या डोंगराचा आकार बघून आमच्या डोळ्यासमोर काल रात्री न पाहिलेले सगळे तारे भल्या पहाटेच चमकून गेले !!! गड चढायला दहा वाजलेले दि…