Posts

Showing posts from November, 2014

एक " बुंगाSSSट" रविवार !!!

Image
एल.एल.बी. च्या परीक्षेचा शेवटचा पेपर !! वेळ काही केल्या पुढे सरकत नाहीये आणि "Remedies for the Breach of Contract" चं भलं मोठं उत्तर लिहिताना नाकी नऊ आले आहेत….डोळ्यासमोर कशेडी घाटाची कमनीय वळणं तरळत आहेत…वरंध्यातून लांबवर दिसणारे राजगड,तोरणा,मढे - उपांडया,रायगड आणि गोप्या घाटाच्या करवतलेल्या कड्यांनी हृदयाचे ठोके चुकवले आहेत…आंबेनळीतून दिसणारी ढवळे ते ऑर्थरसीटची रांग अधिकच रौद्रभीषण झाली आहे….प्रतापगडाची आभाळउंची नजरेच्या कक्षा केव्हाच भेदून गेली आहे…. पण साला तो शेवटचा एक तास काही केल्या आपला हट्ट सोडत नाहीये !!!!!
आमच्या पुणे - भोर - वरंधा घाट - पोलादपूर - कोंढवी किल्ला - आंबेनळी घाट - महाबळेश्वर - पुणे ह्या एका दिवसात जवळपास ३५०-४०० किलोमीटर्स कव्हर करणा-या जंगी प्लॅनला मात्र काही ना काही कारणांनी सुरुंग लागतच होता. त्यामुळे दिवाळीमध्ये घरच्यांकडून आपले लाड पुरवून घेतले आणि ऐन दिवाळीत आमच्या आयुष्यात दरोडेखोरासारख्या घुसलेल्या परीक्षेमार्फत युनिव्हर्सिटीचे फाजील लाड पुरवून झाले की निघायचं ह्या निर्णयाप्रत मी आणि हर्षल आलो आणि रविवारी सकाळी पाचच्या ठोक्याला आलेल्या हर्ष…