Posts

Showing posts from December, 2014

भैरोबाच्या नावानं…चांगभलं !!!

Image
पूर्वप्रकाशित  :  लोकप्रभा - दिनांक १८  डिसेंबर २०१४ : पान क्र.६८थंडीचा पारा प्रत्येक क्षणागणिक वाढतच चाललाय…आकाशात लाखो ग्रहता-यांचं संमेलन भरलंय…कुणी त्यातले गुरु,शुक्र,सप्तर्षी,मृग नक्षत्र ओळखून आम्हालाही खगोलशास्त्राची सैर करून आणतोय…कोणी सह्याद्रीतल्या थरारक चढाईचे अनुभव सांगतोय तर कोणाला भुताखेतांच्या गप्पा मारायचा मनापासून आग्रह केला जातोय !!! हरिश्चंद्राच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या अजस्त्र कड्यांनी पाठीमागे फेर धरलाय…ज्याची रौद्रता मिट्ट काळोखातही डोळ्यांना स्पष्टपणे जाणवतीये….पाचनईमधल्या आमच्या तुकाराम भोईरच्या हक्काच्या ओसरीवर वीस "अट्टल आणि सराईत" डोंगरभटक्यांची ही हळूहळू रंगू लागलेली मैफिल पाहून कोणालाही हेवा वाटला असता ज्याला आम्ही स्वत:ही अपवाद नव्हतोच !! घडाळ्याचे काटे बारावर येउन स्थिरावले तरी प्रचितगड,भैरवगड,पाथरा,कोंडनाळ वगैरे शब्द अजूनही जागेच होते !!!
मायबोलीच्या भटक्या लेखकांचं सालाबादप्रमाणे भरलेलं स्नेहसंमेलनही त्याच्या स्थळाप्रमाणेच भन्नाट होतं !! आमच्या अजय ढमढेरे काकांच्या शब्दात "हरिश्चंद्राचे उपग्रह" म्हणावेत अशा नगर जिल्ह्यातल्या आणि स…