Posts

Showing posts from 2015

अनवट….भूपत… !!!

Image
पिंजल खो-यातल्या अत्यंत अपरिचित गिरीदुर्गाची भन्नाट भटकंती…. !!!

"ओंक्या….शॉट झालाय !!!"  "काय झालं ??" "उद्याच्या ट्रेकसाठी तुझ्या घरी यायला निघालो होतो. डेक्कनपाशी पोहोचलो आणि तेवढ्यात गाडीची क्लच केबल खाड्कन तुटली. आत्ता रात्रीचे साडेनऊ वाजत आलेत आणि दिवाळीमुळे इथली सगळी गॅरेजेस बंद आहेत. मी इथे एकटाच थांबलोय… लवकर काहीतरी कर !!!" "तिथेच थांब…. मी आलो !!"
हर्षल आणि माझ्यातला हा अवघ्या दोनेक मिनिटांचा संवाद ही होती आमच्या उद्याच्या भूपतगडाच्या ट्रेकची झालेली एक "ऑफबीट" सुरुवात !! तासाभरापूर्वीच रायलिंग पठारावरून परतलो होतो. दिवसभर ड्रायव्हिंग आणि त्यात रणरणत्या उन्हातला ट्रेक यामुळे शनिवार जरी सार्थकी लागलेला असला तरी उद्याच्या एका दिवसात जवळपास ५०० किलोमीटर्स कव्हर करणा-या बाईक ट्रेकसाठी थोडीतरी विश्रांती आवश्यकच होती. नुकताच डोळा लागलेला असताना फोन वाजला आणि वरचा संवाद ऐकायचं परमभाग्य पदरी पाडून घेतलं !!!

डेक्कनला पोहोचलो तेव्हा शेजारचा एक भुर्जीवाला आणि आजुबाजुची असंख्य अनोळखी माणसं यांच्या गराड्यात गाडीची तुटलेली क्लच केबल हातात धरून उ…

पाऊस असा रुणझुणता.....

Image
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्त्र डोंगररांग !!! इथले कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणा-या दरीच्या खोलीच्या नुसता अंदाज जरी घेतला तरी बघणा-याचे डोळेच फिरावेत. ह्या बेलाग कडेकपा-यांना कोंदण लाभलंय ते  गहि-या निसर्गाचं आणि रानवेड्या पाउलवाटांचं !! आहुपे...हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचं नाव !! खाली पाहिल्यावर कोकणातलं लोभसवाणं खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख – मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंघावणा-या वा-याचा आवाज...त्याच्या तालावर डोलणारा  हिरवाकंच आसमंत...उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे ....नशीबवान असाल तर समोर अलगद उमटणारं इंद्रधनुष्य आणि हे दृश्य वेडावून पाहणारे आपण...सह्याद्रीमित्र !!!


सह्याद्रीतला पाऊस हा असाच...स्वत:ही तो रसिक असल्याने एखाद्या कविमनाच्या गिर्यारोहकाला चार ओळी सुचल्या नाहीत तरच नवल. वैशाखाच्या तप्त काहीलीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी आसुसलेली धरती आणि पावसाचा पहिला शिडकावा अंगावर घेण्यासाठी रानोमाळ भटकणारा गिर्यारोहक हे गणित आता सह्याद्रीलाही नवीन नाही. बळीराजा जितक्या आतुरते…