Posts

Showing posts from July, 2015

पाऊस असा रुणझुणता.....

Image
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरची एक अजस्त्र डोंगररांग !!! इथले कड्यांची रौद्रता आणि तिथून खाली दिसणा-या दरीच्या खोलीच्या नुसता अंदाज जरी घेतला तरी बघणा-याचे डोळेच फिरावेत. ह्या बेलाग कडेकपा-यांना कोंदण लाभलंय ते  गहि-या निसर्गाचं आणि रानवेड्या पाउलवाटांचं !! आहुपे...हे त्या आगळ्यावेगळ्या दुनियेचं नाव !! खाली पाहिल्यावर कोकणातलं लोभसवाणं खोपिवली गाव आणि त्याच्या शेजारी एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखे भासणारे गोरख – मच्छिंद्रचे बुलंद सुळके. सोबतीला असतो घोंघावणा-या वा-याचा आवाज...त्याच्या तालावर डोलणारा  हिरवाकंच आसमंत...उंच कड्यावरून स्वत:ला दरीत झोकून देणारे पांढरेशुभ्र धबधबे ....नशीबवान असाल तर समोर अलगद उमटणारं इंद्रधनुष्य आणि हे दृश्य वेडावून पाहणारे आपण...सह्याद्रीमित्र !!!


सह्याद्रीतला पाऊस हा असाच...स्वत:ही तो रसिक असल्याने एखाद्या कविमनाच्या गिर्यारोहकाला चार ओळी सुचल्या नाहीत तरच नवल. वैशाखाच्या तप्त काहीलीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी आसुसलेली धरती आणि पावसाचा पहिला शिडकावा अंगावर घेण्यासाठी रानोमाळ भटकणारा गिर्यारोहक हे गणित आता सह्याद्रीलाही नवीन नाही. बळीराजा जितक्या आतुरते…