Posts

Showing posts from June, 2016

खान्देशावर बोलू काही : - भाग एक

Image
रात्रीचे पावणेदोन वाजत आले होते. नाशिकच्या द्वारका चौकात वाहनांची वर्दळ वेळ आणि देहभान विसरून धावतच होती. मुंबई - आग्रा महामार्गाचा गुळगुळीतपणा जाणवायला लागला तसा पुणे - नाशिक प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला . रस्त्यावरचे मैलाचे दगड वेगवेगळ्या गावांशी सलगी करत होते...आमच्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर कमी करत होते. पौर्णिमा दोन दिवसांवर होती. वडाळेभोई गाव जवळ आलं तशी नजर आपोआपच डावीकडे वळाली.....लख्ख चंद्रप्रकाशात धोडपचा बुलंद आकार आणि कांचनाची जुळी टोकं मनात तरंग उमटवून गेली... आठवणी जाग्या करून गेली !!! भाऊडबारीच्या टोलनाक्याच्या आधी कांचना,मांचना,बाफळ्या,शिंगमाळ या असीम शिखरांवरून फिरत असलेली नजर विसावली ती राजदेहेर,कोळदेहेर आणि इंद्राई दुर्गांवर !! सातमाळा रांग आणि आमचं मनस्वी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं....आनंद देऊन गेलं. मालेगाव चौफुलीवरच्या हॉटेलमध्ये फर्मास चहाचे घुटके घशाखाली रिचवत असताना चर्चा रंगल्या त्या मार्कंड्याच्या आभाळउंचीच्या,मोहनदरीच्या जगावेगळ्या नेढ्याच्या,कण्हेरगडाच्या खडतर चढाईच्या आणि धोडपच्या सर्वगुणसंपन्नतेच्या !! गाडीला आता वेग आला. रात्रीचा शेवटचा प्रहर सुर…