Posts

Showing posts from October, 2016

एक दिवाळी.....आडवाटेवरची !!

Image
नक्की तारीख आठवत नाही....पण भल्या पहाटे जेव्हा सिंदोळा किल्ल्याच्या पायथ्याचं बगाडवाडी गाव गाठलं त्यावेळी सह्याद्रीच्या अजस्त्र कड्यांमागून तेजोभास्कराची रोषणाई झालेली होती आणि गावातल्या प्रत्येक घरात संध्याकाळच्या रोषणाईची जोरदार तयारी सुरु होती. गावातल्या अनेक चेहे-यांवर “दिवाळीत घरी बसायचं सोडून ही चार कार्टी इथं कुठं कडमडायला आली !!” असले भाव स्पष्ट झळकत होते. आम्ही मात्र त्यांना एक लाघवी हास्य दिलं आणि सिंदोळयाची पायवाट तुडवू लागलो....तो माहोलच काही और होता !!
निमित्त होतं दिवाळी स्पेशल म्हणून आखलेल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि जुन्नर तालुक्यातल्या सिंदोळा,हडसर,चावंड आणि निमगिरी या चार भन्नाट किल्ल्याच्या स्वैर भटकंतीचं. ऐन दिवाळीत घरी बसायचं सोडून पोरगं अजून तिघाचौघांना नादाला लावून आणि पाठीवर बोचकी घेऊन भटकायला निघालंय या कमालीच्या उद्विग्नतेतून निर्माण झालेल्या आणि कानावर सुतळीबॉम्ब सारख्या फुटणा-या घरच्यांच्या शिव्या ऐकल्या आणि बाईकवरून पहाटेच्या प्रचंड थंडीत रक्त गोठवत सिंदोळा किल्ल्याचा पायथा गाठला. सिंदोळा किल्ला मात्र भन्नाट आहे. नाळेतली खडी चढाई अंगावर आली पण वरून दिसणा-या स…