Posts

Showing posts from December, 2016

Save the Sahyadri .....

Image
नमस्कार गिरीमित्रांनो व भटक्यांनो,  सह्याद्रीतल्या ट्रेकिंगचा "Peak Season" म्हणजे अगदी सदाहरित व बारमाही !!! महाराष्ट्रातल्या दुर्गम गडकोटांकडे,घाटवाटांकडे गिर्यारोहकांची पावलं वळू लागतात आणि या सह्याद्रीउत्सवाला अगदी उधाण येतं . पण या वाढत्या ट्रेकिंग संस्कृतीबरोबर काही उत्साही पर्यटकांमुळे सह्याद्रीला आणि त्याच्या जैवविविधतेला धोका उत्पन्न झाल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जिथे जाऊ तिथे दारूच्या बाटल्यांचा खच,सिगारेटची पाकिटं, कचरा, आधीच मरणासन्न अवस्था भोगणा-या अवशेषांवर लिहिल्या जाणा-या प्रेमकहाण्या आणि त्याला खतपाणी घालणारे बेताल पर्यटक हे दृश्य आता सहन करण्याच्या पलीकडे गेलं आहे. निव्वळ निष्काळजीपणामुळे डोंगरांमधील वाढू लागलेले अपघात हाही चिंतेचा विषय आहेच.त्यामुळे तैलबैला येथे नुकत्याच पार पडलेल्या Sahyadri Trekkers Bloggers Meet मध्ये या सर्व गोष्टींना अंकुश बसावा आणि गिर्यारोहण सुरळीत व्हावं यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलण्यात आलं आहे. Sahyadri Trekkers Bloggers च्या सदस्यांनी काही प्रतिबंधात्मक चिन्ह तयार केली असून त्याचे फ्लेक्स प्रत्ये…