Posts

Showing posts from February, 2017

अरण्यवाटा.... !! - भाग एक

Image
"मास्तर ती दूधगावची एसटी किती वाजता आहे हो  ??" "शी बाई केवढे डास आहेत इथे !!"  "अय... त्यांना विचार टायलेट कुठे आहे " "आयला हे तंबू लावून कोन झोपलंय हिथं  ?? आरं नसेल हाटेल परवडत !!!"
शनिवारच्या पहाटेचे हे संवाद आमच्या कानावर आदळत होते ते साडेपाचचा गजर म्हणूनच  !!  टेन्टच्या बाहेर अनेक सावल्या जमा झालेल्या बघून आपण यांच्या चर्चेचा विषय ठरायला लागलोय हे आमच्या लक्षात आलं आणि तिघेही ताड्कन उठून बसलो. महाबळेश्वरच्या एसटी स्टॅन्डमध्ये टेन्ट लावून झोपणारे इतिहासात आम्हीच पहिलेच असू !! शुक्रवार रात्रीचा बाईकवरून केलेला पुणे ते महाबळेश्वर प्रवास चांगलाच अंगी लागला होता. त्यात रात्री १.३० वाजता एसटी स्टॅण्डमध्ये घडलेल्या भन्नाट प्रसंगाने (हा किस्सा भेटल्यावर सांगेन) झोपायला आधीच उशीर झालेला. टेन्टची कनात उघडून बाहेर आलो तेव्हा आमच्याच शेजारी दोन कॅरीमॅट पडलेली दिसली आणि आपण एकटेच एसटी स्टॅण्डवर जमलेल्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय नाही या आमच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला !! सकाळचे सगळे सोपस्कार पार पडून आणि त्या कॅरीमॅट्सचे मालक असलेल्या युथ हॉस्टेल मालाडच्…