Posts

Showing posts from March, 2017

अरण्यवाटा.... !! - भाग दोन : अंतिम

Image
अरण्यवाटा....!! भाग एक

लहुळश्यातली सकाळ उजाडली तीच मुळी मामांच्या घरच्या आवाजानं. ओसरीवर सांडलेल्या आमच्या तीन देहांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून घरातली सगळी कामं व्यवस्थित चालू होती. समोरच्या भिंतीवर निष्काम कर्मयोगाची साधना करणा-या घडाळ्याकडे माझं लक्ष गेलं आणि आमची झोपच उडाली !!   सकाळी सहाला उठू म्हणून काल रात्री ११ लाच गाशा गुंडाळलेले आम्ही ७.४५ झाले तरी स्लीपिंग बॅगच्या कुशीत लोळत पडलो होतो. आमची धांदल ऐकून मामी बाहेर डोकावल्या आणि त्यांनी दुसरा बॉम्ब फोडला "ह्ये गेलेत मळ्यात झोडपणीला. येतील तासाभरात. तुम्ही आवरून घ्या मी चहा अन पोहे करते. " आली का आता पंचाईत !! पुढचा तासभर तरी मामांचं दर्शन लाभण्याचं भाग्य आमच्या नशिबी नव्हतं. पण बहुदा आमच्या मनात सुरु झालेली वेळेची गणितं आणि ओघाने होणारा उन्हाचा त्रास या दोन्ही गोष्टी मामींनी अचूक ओळखल्या आणि द-याच्या दंडाच्या संपूर्ण वाटेवर घनदाट जंगल आहे हे सांगून आमचे जीव चहाच्या कपात पाडले !! हर्षलने परममित्राचं परमकर्तव्य पार पाडत शेजारच्या दुकानातून आणलेल्या बिस्किटांच्या पुड्याचे आम्ही तिघं आणि मामांचा कुत्रा असे चार सामान भाग झा…